Marathi Ukhane For Groom – For Marriage
अरुणासह ऊषा आली, सोनियाची प्रभा पसरली —रावांचे नाव घ्यायला मी नाही विसरली.
शब्द तिथे नाद कवी तिथे कविता
—रावांची जोड जणू सागर आणि सरिता.
नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पर्दापण
—रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण.
चंदनाच्या झाडावर बसला मोर
—रावांच्या जीवावर मी आहे थोर.
संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर
आयुष्याचा प्रवास करते — रावांबरोबर.
सुर्यबिंबाचा कुंकुम तिलक, प्रुथ्वीच्या भाळी
— रावांचे नाव घेते — च्यावेळी.
संसाराच्या देव्हा-यात उजळ्तो नंदादीप समाधानाचा
— रावांचे नाव घेऊन,मागते आशिर्वाद अखंड सौभाग्याचा.
मंगळ्सूत्रात राहे सासरची प्रीती
— रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती.
पित्याचे कर्तव्य संपले,कर्तव्याला माझ्या सुरूवात
— रावांचे सह्कार्य लाभो, माझ्या भावी जीवनात.
नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सर्वांचा
—रावांचे नाव असते ओठांवर,पण प्रश्न असतो उखाण्याचा
सुखी संसारात हवी विश्वासाची जोड
—रावांचे नाव घेते, घास घालून तोंड करते गोड.
संसाररुपी कादंबरीचे उघडले पहिले पान
—रावांचे नाव घेऊन तुमचा करीते मान.
लक्ष्मी शोभते दागदागिन्यांनी, विद्या शोभते विनयाने
—रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाने.
शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान
— रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान.
आत्मरुपी करंडा, देहरुपी झाकण
— रावांचे नाव घेऊन बांधते मी कंकण.
Ukhane Marathi for Marriage
लग्नाचे बंधन,जन्माच्या गाठी
—रावांचे नाव घेते तुमच्यासाठी.
कुलीन घराण्यात जन्मले,कुलवान घराण्यात पडले
—रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले.
माहेरच्या ओढीने डोळे येतात भरुन
—रावांच्या संसारात मन घेते वळून.
स्वर्गाच्या नंदनवनात सुवर्णाच्या केळी
— रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्यावेळी.
रुप्याच्या वाटीत सोन्याचा चमचा
—रावांचे नाव घेते मिळो आशिर्वाद तूमचा.
नाही मोठेपणाची अपेक्षा,नाही दौलतीची इच्छा …रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा.
मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार
— रावांच्या रुपाने झाला साक्षात्कार.
सर्वाना नमस्कारासाठी जोडते हो हात
—रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची
—रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची.
आकाशाच्या अंगणात ब्रम्हा,विष्णू आणि महेश
…रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश.
…रावांचे नाव घेऊन करते हो ग्रुहप्रवेश.
सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही
—- रावाचं नाव ह्ळुच ओठी येई.
हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी
— रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
— रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.
नव्या आयुष्याची नवी नवी गाणी
— च्या घराण्यात — रावांची झाले मी राणी.
माहेर जणू गंगा, सासर जणू सागर
त्यातच एकरुप — रावांचे सूख निर्झर.
पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते
— रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते.
सुवर्णाची अंगठी, रुप्याचे पैजंण
— रावांचे नाव घेते ऐका सारेजण.
मनाच्या व्रुंदावनात आंनद डोलते भावनेची तुळस
— रावांच्या साथीने संसार मंदिरावर सुखाचा कळस.
सासरचे निराजंन माहेरची फुलवात
— रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात.
आई-वडील सोडताना, पाऊल होतात कष्टी
— रावांच्या संसारात करीन मी सूखाची व्रुष्टी.
बदामाचा केला हलवा त्यात टाकले काजू किसुन,
….रावं बिड्या पितात संडासात बसून.
महादेवाला बेल, विष्णूला तुळस
— रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस.
आजच्या पिढीला नक्की आवडेल असा नवनवीन, मजेशीर, लग्न तसेच इतर खास दिवसांसाठीच्या navriche ukhane मराठी उखाण्यांचा बहारदार नजराणा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा